मंठा । वार्ताहर
आधुनिक भारताचे शिल्पकार माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आ.राजेश राठोड मित्र मंडळाच्या वतीने तसेच काँग्रेस पदाधिकार्यांच्या उपस्थितीत गरीब व गरजूंना फूड पाकिटांचे आणि फळांचे वाटप करण्यात आले.
दि.21 ते 27 मे दरम्यान आ.राजेश राठोड मित्र मंडळाच्या वतीने विशेष सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या दरम्यान फिजिकल डिस्टन्स पाळून सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने 21 मे पासून या विशेष सप्ताहाला सुरुवात होत असून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जयंतीदिनापर्यंत म्हणजे 26 मे पर्यंत मोफत अन्न पाकीट व फळ वाटप केले जाणार आहे. गुरुवार रोजी सकाळी या विशेष सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बंद पाकिटात खिचडी, केळी आणि पाणी बॉटल वाटप करण्यात आले. आ.राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमासाठी उपनगराध्यक्ष सिराज पठाण, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश घुले, अॅड.मधुकर मोरे, सुरेश वाव्हळे, मोईन कुरेशी, कय्युम कुरेशी, शबाब कुरेशी, राजेश खंदारे, अमरसींग राठोड, पंडित राठोड, बाज पठाण, अशोक चव्हाण, सादेक बागवान, राम राठोड, अशोक मुसळे, राजेश मगर, हरिभाऊ ताठे,आदी उपस्थित होते.
Leave a comment