जालना । वार्ताहर
तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरील दहशतवादी हल्ल्याचा विरोध म्हणून ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’ पाळण्यात येतो. या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्यांना प्रतिज्ञा दिली.
यावेळी उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन श्रीमती शर्मिला भोसले, नायब तहसिलदार श्रीमती मयुरा पेरे, श्रीमती आर.आर.महाजन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त घेण्यात आलेली प्रतिज्ञा
आम्ही, भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याद्वारे, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करत आहोत. आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्व मानवजातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करु, तसेच मानवी जिवीत आणि मूल्ये धोक्यात आणणार्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करु.
Leave a comment