जालना । वार्ताहर
देशभरात पसरत चाललेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रतीबंध घालण्यासाठी देशभरात लॉक डाऊन केल्यामुळे या काळात जिल्ह्यातील नागरिकांनी लॉक डाऊनचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून पोलिस विभागा कडुन 586 वाहनं जप्त करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे यात सर्वसामान्यांना जिवानश्यक धान्य, किराणा सामान भाजीपाला या व इतर आवश्यक कामांसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांवर ही कार्यवाही करण्यात आलेली आहे, करीता या सर्व जप्त करण्यात आलेल्या वाहनांना शासकीय नियम अटी, शर्तीनुसार पुर्तता करून परत नागरिकांना देण्यात याव्यात अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना ई-मेल वर निवेदनाव्दारे मागणी करण्यात येत आहे.
या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी दीपक डोके, अकबर इनामदार,विष्णु खरात, दिपक घोरपडे, अँड.कैलास रत्नपारखे, विनोद दांडगे, सचिन कांबळे, नाना जाधव,अर्जुन जाधव, गौतम वाघमारे, विलास नरवडे, नितीन बाळराज, राजाभाऊ दाहिजे,सुरज सोनवणे, भैय्यासाहेब पारखे,कांतीराम आढाव,बाळु शिंदे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
Leave a comment