बदनापूर । संदीप पवार
तालुक्यात अवैधरित्या दुधना पात्रातून माफिया वाळूचा सर्रास उपसा करून वाळू साठा करीत विक्री करीत असून पोलीस व महसुल प्रशासनाने तालुक्यात दोन ठिकाणी छापे मारून 140 ब्रास वाळू जप्त केली आहे. बदनापूर तालुक्यात वाळू माफियांनी हैदोष घातला असून लॉक डाऊन मध्ये बदनापूर तालुक्यात विविध नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून हायवा वाहनाने वाहतूक करीत असताना पोलीस निरीक्षक एम बी खेडकर,सहाय्यक फौजदार शेख इब्राहिम आदींनी वाहने धरून पोलीस कारवाई केली मात्र ततत्कालिन निलंबित तहसीलदार छाया पवार यांनी वाळू माफियाविरुद्ध पाऊल उचलले नाही त्यामुळे निलंबन आदेशात ठपका ठेवण्यात आलेला आहे.
दरम्यान वाहने धरली जात असल्याने वाळू माफियांनी नवीन शक्कल लढवली असून दुधना नदी पात्रातून वाळू उपसा करून विविध ठिकाणी साठा केला जात आहे तालुक्यातील रामखेडा व अकोला शिवारात वाळू साठा करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळताच 18 मे रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक एम बी खेडकर,सहाय्यक फौजदार शेख इब्राहिम बदनापूर सज्जा तलाठी सुनील होळकर यांनी संयुक्तरित्या रामखेडा व अकोला शिवारात छापा मारून 140 ब्रास वाळू जप्त करून पंचनामा केल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे
Leave a comment