बदनापूर । वार्ताहर
तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणार्या मांजरगाव येथील एका तरुणासह त्याच्यासोबत असणार्या 19 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बदनापूर तालुक्यातील मांजरगाव येथील तेवीस वर्षीय सचिन सखाराम आरसुड याने आपल्या 19 मित्रासोबत मांजरगाव नदीच्या पुलावर भर रस्त्यात सार्वजनिक ठिकाणी मोटारसायकल लावून त्या ठिकाणी गैरकायद्याच्या लोकांना जमवून त्या मोटारसायकलवर केक ठेवून तलवारीने कापला.
या बाबत बदनापूर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी आरोपी सचिन सखाराम आर्सुळ व त्यासोबत असणारे अशोक भगवान आर्सुळ , बाबासाहेब भगवान डाके , प्रकाश पंढरीनाथ आर्सुळ , सचिन जनार्धन आर्सुळ , मुंकूद भगवान डाके , लक्ष्मण मच्छिद्रनाथ पाझाडे , रवि बंन्सीलाल आर्सुळ , भाऊसाहेब श्रीमंत डाके , अमोल बंजरंग डाके , दिपक धुराजी आर्सुळ , साईनाथ श्रीमंत पाझाडे , संकेत प्रभाकर आर्सुळ , नाथा जमुनाजी वाकडे , महेश तुळशीराम डाके , प्रदिप नानासाहेब डाके , सतिष मधूकर कांबळे, गजानन हरीभाऊ आर्सुळ , विशाल बबन वाकडे ,सर्व राहणार मांजरगाव व नितीन पांडूरंग भांड रा. ढोकसाळ हे उपस्थित होते. या सर्वाविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवून तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला गुन्हा नोंद केला असून मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. सध्या जिल्हाधिकारी यांनी आपत्ती निवारणार्थ जमावबंदी आदेश असताना ही घटना घडल्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. पुढील तपास पो.हे.का. खंडागळे हे करीत आहे.
Leave a comment