घनसावंगी पोलीस ठाणे व तहसील कार्यालय येथे मास्क व सॅनीटायझर वाटप करून भाजपचे निवेदन
तीर्थपुरी । वार्ताहर
घनसावंगी विधानसभा मतदार संघातील लॉकडाऊनच्या काळात शेतकर्यांना मोसंबी,टरबूज केळी व भाजीपाला विक्री न करता आल्यामुळे शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत त्यामुळे हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी. घनसावंगी तालुक्यातील अतिवृष्टीच्या काळातील फळबागाची 32 गावातील शेतकर्यांना निधीअभावी शेतकर्याची अनुदान रखडले आहे ते त्वरित देण्यात यावे.
तीर्थपुरी येथील 132 केव्ही चे काम त्वरित सुरू करून तीर्थपुरी येथील 33 केव्ही उपकेंद्रात 10 एमव्ही ए ट्रांसफार्मर बसवण्यात यावा त्यामुळे शेतकर्याला वीजपुरवठा सुरळीत मिळेल. या सहआदी. मागणीकरिता आज घनसावंगीचे तहसीलदार गौरव खैरनार यांना भाजपच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनावर माजी आमदार विलास खरात भाजपचे घनसावंगी तालुका अध्यक्ष शिवाजी बोबडे माजी तालुका अध्यक्ष देवनाथ भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष जाधव योगेश देशमुख जुगल किशोर चांडक शेषनारायन मापारे आन्नासाहेब बोबडे आदींच्यासहया आहेत.
Leave a comment