एसपी हर्ष पोद्दार यांचे पोलीसांना आवाहन
जिल्ह्यात पोलीसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप
बीड । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी कर्तव्यावर असताना अत्यंत काळजीपूर्वक खबरदारी घेवून सुरक्षा साहित्याचा वापर करुन कर्तव्य बजवावे अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिल्या आहेत.
मुंबईतील पोलीस महासंचालक कार्यालयातून राज्यभरातील अधिकारी, कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी मास्क आणि सॅनिटायझर पुरवले जात आहेत. यानुसार प्रत्येक अधिकारी व कर्मचार्यास एक सॅनिटारझर बॉटल व प्रत्येकी चार मास्क दिले जात आहेत. यातंर्गत बीड जिल्ह्यात पोलीसांना मास्क वितरित केले गेले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.
मंगळवारी (दि.7) बीड येथील कार्यालयीन अधीक्षक यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील 260 अधिकारी,कर्मचार्यांना या साहित्याचे वाटप केले. तसेच मुख्यालयातील राखीव पोलीस उपनिरीक्षकांनी सर्व 290 अधिकारी व कर्मचार्यांना मास्क व सॅनिटायझर पुरवले. तसेच जिल्ह्यातील सहा उपविभागात उपविभागीय कार्यालयाकडून सर्व 1324 अधिकारी व कर्मचार्यांना यया साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. सर्व सुरक्षा साहित्य पोलीस निरीक्षक (जिल्हा विशेष शाखा) यांच्या कार्यालयातून वितरित केले जात आहे. सुरक्षा साहित्य 4 एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर अधीक्षक स्वाती भोर, अप्पर अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणे प्रभारी अधिकारी यांनी जिल्ह्यात सर्व अधिकार्यांसह कर्मचार्यांना वाटप केले आहे.
----
(फोटो ओळी) बीड ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुजीत बडे यांच्या हस्ते कर्मचार्यांना मास्क व सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले.
Leave a comment