माजलगाव । वार्ताहर
माजलगाव शहरात रविवारी सकाळी 7 ते 9.30 वाजेच्या शिथिलतेनंतर मंगळवारी सकाळी 11 वाजता म्हणजे तब्बल 50 तासाच्या संचारबंदी नंतर माजलगाव शहरातील मोंढ्यात,भाजीपाला मार्केटमध्ये तसेच बँकेत एकच गर्दी उसळली होती.सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले. जमावबंदी आदेशाची पायमल्ली झाल्याचे चित्र दिसून आले.
बँक अधिकारी व पोलीस यंत्रणाही हतबल झाल्याचे दिसून आले. कोरोनाच्या धसकीने नाही तर पोलिसांच्या माराच्या भीतीने नागरिक बाहेर पडत नाहीत. लोकांना कोरोनाची भीतीच राहिली नाही. बँकेसमोरच्या रांगे वरून लक्षात येत होते. मंगळवारी माजलगाव नगर परिषद हद्दीत सकाळी 11 ते 3 या वेळेत संचारबंदीत शिथिल आहे. रविवार व सोमवारी बँक बंद राहिल्यामुळे मंगळवारी सर्व बँकात एकच गर्दी झाली होती. तर भाजीपाला मार्केट व मोंढ्यात किराणा खरेदी साठी एकच गर्दी झाली होती.
Leave a comment