जालना । वार्ताहर

अंबड व घनसावंगी तालुक्यातील गोदाकाठच्या गावांमधील नागरिकांनी जनावरांच्या व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी गोदापात्रात पाणी सोडण्याबाबत पालकमंत्री ना. राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. 

पालकमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांची व शेतकर्‍यांची दखल घेऊन गोदावरी पाटबंधारे महामंडळ, कार्यकारी संचालक व कडाच्या अधिकार्‍यांना सूचना करून गोदावरी पात्रात उजव्या कालव्यातून पाणी सोडल्याने बळेगाव, आपेगाव, साष्ट पिंपळगाव, गोरी गंधारी, शहागड, वाळकेश्वर, कुरण व पाथरवाला बु. आदी गावांना पाण्याचा फायदा होणार आहे, तसेच दोन दिवसांनी जोगलादेवी, मंगरूळ व राजाटाकळी उच्च पातळी बंधार्‍यामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतकर्‍यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच राजाटाकळी बंधार्‍यातून भादली, शिरसवाडी व गुंज या गावांना पाणी सोडण्यात येणार आहे.त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी व शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.