परतूर । वार्ताहर
कोरोना विषानूसह मागील काही दिवसासापूर्वी वादळी वार्यासह पाऊस झाला आहे यामध्ये शेतकर्याचे मोठे नुकसान झाले आहे यातच लॉकडाऊन सूरु असल्याने उपलब्ध असलेल्या शेतमालाही योग्य भाव मिळत नाही त्यामुळे खरीप हंगामाची पेरनी काण्यासाठी शेतकर्याना तात्काळ पीककर्ज देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन भाजपा युवा मोर्चाचे तालूका अध्यक्ष संपत टकले यांनी उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांना दिले आहे.
लॉकडाऊनमुळे शेतमालाला योग्य ते भाव मिळत नाही यांतच खरीप हंगाम डॉक्यावर आला आहे त्यामुळे बी-बियाणाची खरेदी कशी करावी यांची चिंता शेतकर्यांना सातवत आहे दरवर्षी पीककर्जाची प्रक्रिया एप्रिल महिन्या पासून होत असते यावर्षी मे महिन्याच्या अखेरपर्यंत संपला असून अद्यापही पीक कर्जाची प्रक्रीया सुरु झालेली नाही गेल्या काही दिवसांमध्ये विनाअट पीक कर्ज वाटपाचे आदेश जिल्ह्यातील बँकाना देण्यात यावे असेही निवेदनात म्हटले आहे.
Leave a comment