वडोद तांगडा येथे वधू-वर अडकले बंधनात
पिंपळगाव रेणुकाई । वार्ताहर
भोकरदन तालुक्यातील वढोत तांगडा येथील गजानन तांगडे यांच्या शेतामध्ये एका वृक्षाच्या सावलीचा आधार घेत काल दि. 17 रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न कार्य पार पडले शेतामध्ये झालेल्या छोटेखानी समारंभात सोशल डिस्टन्सिंग या निर्णयाचे पालण करण्यात आले होते. वडोद तांगडा येथे रविवारी दुपारी एक वाजता श्री कडुबा राघो तांगडे यांची मुलगी चिं सौ.का अश्विनी हिचा विवाह सिल्लोड तालुक्यातील जळकी बाजार येथील श्री दगडू गजेबा तांगडे. यांचा मुलगा चिं.आदेश दांडगे यांच्यासोबत पार पडला.
विवाह प्रसंगी या कार्यक्रमाला नवदांपत्यासह पाहुण्याने देखील सामाजिक अंतराचं पालन केल्याचे दिसून येत होते.कोरोणाचा प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण देशात संचारबंदी व लॉक डावुन पाळण्यात येत आहे. त्याला प्रतिसाद देत हा विवाह नवयुवक तरुणांसाठी एक प्रकारे आदर्श ठरला आहे या विवाहासाठी गावातील व वर पक्षातील मोजक्याच पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते.दरम्यान पाव्हण्यासाठी जेवणासाठी चा कार्यक्रम रद्द करून ्पोहे आणि शिरा असा अल्पोपहार ठेवण्यात आला होता.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडावुनच्या काळात झालेला हा विवाह पारंपरिक पद्धतीला ङ्गाटा देऊन समाजासाठी एक आदर्श विवाह ठरला आहे.
Leave a comment