बदनापूर । वार्ताहर
शुक्रवारी झालेल्या वादळी वार्यामुळे कुसळी येथील अल्पभुधारक शेतकर्याचे कुकुटपालनासाठी बनवलेले शेड उडून जाऊन मोठया संख्येने पक्षी मृत्यूमुखी पडून 10 लक्ष रुपयांचे नुकसान झाले हेाते. त्या शेतकर्याच्या मदतीला शिवसेना धावली असून शिवसेनेचे तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण यांच्या हस्ते एक लक्ष रुपयांची मदतीला धनादेश देण्यात आला.
80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या उक्तीप्रमाणे शिवसेना तालुक्यात काम करत असते. बदनापूर तालुक्यातील कुसळी येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसात गट क्रमांक 253 मधील अल्पभ्ूधारक शेतकरी विष्णू रामभाऊ काकडे याने जोडव्यवसाय म्हणून तीन शेड उभारून कुकुटपालन सुरू केलेले होते. परंतु या पावसात हे शेड उडून दीड हजार गावरान पक्षी व दीड हजार बॉयलर पक्षी मृत्यूमुखी पडल्याची घटना घउली होती. सदरील शेतकर्याने नातलग, मित्रपरिवार व काही खाजगी लोकांकडून जवळपास 10 लक्ष रुपये जमा करून हा कुकुटपालन व्यवसाय सुरू केलेला हेाता. परंतु आलेल्या वादळी पावसाने प्रचंड नुकसान केल्यामुळे काकडे हे आर्थिक विंवचेणत होते. ही बाब शिवसेना तालुकाप्रमुख जयप्रकाश् चव्हाण यांना कळताच त्यांनी तात्काळ या गटाच्या जिल्हा परिषद सदस्या अयोध्या चव्हाण यांच्या जिल्हा परिषद शेष फंडातून 1 लक्ष रुपयांची मदत कुसळी येथे जाऊन सदरील शेतकर्याला दिली. या रकमेतून या शेतकर्याला आर्थीक आधार झाला आहे. यावेळी सरपंच भाऊसाहेब वैद्य, उपसरपंच तातेराव शेळके, माजी सरपंच नारायण हाकवणे, सतीष हाकवणे, राम वैद्य, माऊली पवार, वैद्य आदींची उपस्थिती होती.
Leave a comment