गेवराई । वार्ताहर
पीपीई (पर्सनल प्रोटेक्शन इक्युपमेंट) कीटचा तुटवडा दाखवून ते काळ्या बाजारात चढ्या भावाने ग्राहाकांना देत आसल्याने महसूल प्रशासनाने सोमवारी (दि.6) तालुक्यातील 28 औषधी दुकानावर कार्यवाही करून मास्क आणि सॅनिटायझर जप्त केले.
कोरोना या जिवघेण्या आजारा पासून संरक्षण व्हावे यासाठी लागणार्या पीपीई (पर्सनल प्रोटेक्शन इक्युपमेंट) कीटची काळ्या बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असून जास्त भावाने विक्री होत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या निर्दशनात आल्याने त्यांनी उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांना याबाबत सुचना दिल्या. त्यानंतर महसुल विभागाने तालुक्यातील सर्व औषधी दुकानाची तपासणी केली. यामध्ये 28 दुकानदारांनी पीपीई कीटचा साठा करून या कीटचा तुटवडा दाखवून चढ्या भावाने विक्री करत असल्याचे निर्दशनास आले. त्यामुळे या दुकानातील 125 मास्क 100 मिलीचे 3386 बॉटल 500 मिलीचे 125 बॉटल सोमवारी जप्त करून तहसील कार्यालयात जमा केले. ही कारवाई नायब तहसीलदार प्रशांत जाधवर मंडळाधिकारी तलाठी यांनी केली.
---------
Leave a comment