तिर्थपुरी । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यात व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मतदारसंघात मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक शहरातून येणार्या लोकांची लोंढे ग्रामीण भागातील गावागावात लोक येत असल्यामुळे अनेक गावातील कोरोना या भयानक संसर्गजन्य आजाराच्या प्रादुर्भावामुळे अनेक लोकांना कोरंटलू असले तरी हे आलेले शहरी लोक यांना 14 दिवस घरातच रहा बाहेर फिरू नका असे आदेश संबंधित ग्रामपंचायतीने दिले असतानाही हे शहरी आलेले लोक मात्र ऐकायला तयार नसून राजरोसपणे गावात गर्दीच्या ठिकाणी किराणा दुकानावर गावातील सलून कारागिराकडे कटिंग दाढी सुरू केल्या असून यामुळे कोरोना आजाराचा शिरगावच्या भीतीने ग्रामीण भागातील लोकांमध्ये धाकधूक वाढली आहे.
यावर ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक पोलीस पाटील संबंधित ग्राम ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने या आलेल्या शहरी लोकांना घरोघरी जाऊन समज द्यावी तरच कोरणा आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून अनेक गावात गाव बंदी नाका-बंदी असे एकूण तीर्थपुरी परिसरात पंचवीस ते तीस गावांमध्ये प्रवेश बंदी केली असली तरी बाहेर गाऊन शहरी येणारे लोकांचे लोंढे गावागावात येऊ लागले यामुळे शहरातून आता ग्रामीण खेड्यापाड्या कोरणा शिरगाव होऊ नये म्हणून विशेष खबरदारी व काळजी गावागावातून ग्रामस्थांनी घेतली तरच बरे नाहीतर मोठी डोकेदुखी पुढील काळात होते की काय असा समज लोकांमधून केला जात आहे.
Leave a comment