तिर्थपुरी । वार्ताहर
गोंदी पोलीस ठाण्यातील तीर्थपुरी पोलीस चौकी मधील धील वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे यांची गोंदी पोलिस ठाण्यातून पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांनी तडकाफडकी उचलबांगडी करून नागरगोजे यांना सदर बाजार पोलिस ठाण्यात हलविण्यात आले तसेच नागरगोजे हे गोंदी पोलीस ठाण्यात रुजू झाल्यापासून त्यांच्याविरुद्ध गंभीर तक्रारी चैतन्य यांच्याकडे केल्या असून तसेच पाथरवाला येथील वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर नागरगोजे यांनी 50 हजार रुपये घेतल्याचा आरोप एका व्हिडीओ क्लिप सर्वत्र व्हायरल झाली होती हे प्रकरण प्रचंड गाजले होते याची गंभीर दखल जालना पोलीस अधीक्षक चैतन्य यांनी घेऊन तात्काळ गोंदी पोलीस ठाणे येऊन सविस्तर चौकशी केली व भागवत नागरगोजे यांची या प्रकरणी गंभीर दखल घेऊन याची चौकशी परतुर येथील डीवायएसपी बांगर यांच्याकडे दिल्याचे समजते.
तसेच तसेच जोगलादेवी येथील वाळू माफियांची एक हायवा पकडून सोडून दिल्याच्या तक्रारी व काही वर्तमानपत्रात मीडियामध्ये सविस्तर बातम्या आल्या होत्या तसेच नागरगोजे व गोंदी पोलीस ठाण्याची पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्यामध्ये अनेक दिवसापासून बेब नाव अंतर्गत वाद यामुळे पोलीस ठाण्यात वाद-विवाद दोघांमध्ये होत असल्याच्या तक्रारी वरिष्ठांपर्यंत गेल्या होत्या यामुळे नागरगोजे वादग्रस्त असून काही पोलीस कर्मचारी यांच्यामध्ये तीर्थपुरी चौकीमध्ये अंतर्गत वाद होत असताना नागरगोजे यांच्याबद्दल व काही पत्रकारांना टारगेट करून संचार बंदीच्या काळात आपल्याबद्दल लिखाण करणार्या पत्रकारांना वेगळेपणाची वागणूक जिल्ह्याचे समजते यामुळे गोंदी पोलीस ठाण्याचे मिलिंद खोपडे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली त्यांच्या जागी रत्नदीप जोगदंड नवे प्रभारी गोंदी पोलिस ठाण्यात रुजू होणार असून तसेच शहागड पोलीस चौकीचे हनुमंत वारे यांची चंदंजिरा पोलीस ठाण्यात तडकाफडकी बदली झाल्याचे समजते तसेच या संचारबंदी लॉक डाऊनच्या काळात अधीक्षक एस चैतन्य यांनी 3 अधिकार्यांच्या बदल्या तडकाफडकी केल्यामुळे गोंदी पोलीस ठाण्यात अंतर्गत एकच चर्चा उलट सुलट ऐकावयास मिळत आहे.
Leave a comment