जालना । वार्ताहर
कोरोना विषाणू रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी शहरात दुकानाला वेळेचे बंधन घालून दिले होते त्या आदेशाची पायमल्ली करणार्या दुकानदारा विरुद्ध पोलीस उपनिरीक्षक गजानन कौळासे पोलीस हेडकॉन्स्टेबल परशुराम पवार पोलीस कॉन्स्टेबल अंबादास दांडगे संदीप बेराड जीप पेट्रोलींग करत असताना सकाळी साडेनऊ ते बारा वाजेच्या दरम्यान सुभाष रोड सरफा रोड कपडा मार्केट दाणा बाजार इत्यादी ठिकाणच्या अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त काही दुकानदार आपले दुकान उघडून ग्राहकांची गर्दी जमुन तोंडाला मास्क न लावता विनापरवाना आपल्या मालकीच्या दुकानातील माल ग्राहकांना विक्री करत असताना मिळून आले त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) वेंकटेश गंगाप्पा नायडु वय 52 वर्ष2) गोविंदम चींनाप्पा नायडू 53 वर्ष चेन्नई कॉटन सेल 3) ज्ञानेश्वर जनार्दन जाधव वय 36 वर्ष माही कलेक्शन 4) श्रीवास श्याम सुंदर मणियार वय 48 वर्ष कोक्री क्रिएशन व 5) प्रवीण विजय बसयै वय 33 वर्ष यांनी आपले दुकाने उघडून दुकानातील माल विनापरवाना ग्राहकांची गर्दी जमुन कोरोना विषाणु महामारी पसरण्याची हयगयचे घातक कृत्य करून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांचे विरुद्ध पोलीस उपनिरीक्षक गजानन कौळासे यांनी फिर्याद देऊन पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल परशुराम पवार हे करीत आहे,सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक एस चैतन्य,अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख पोलीस उपनिरीक्षक गजानन कौळासे पोकॉ अंबादास दांडगे पो कॉ संदीप बेराड यांनी केली*
Leave a comment