बीड । वार्ताहर
दिल्ली येथील निजामुद्दीन मरकज व उत्तर प्रदेश राजस्थान हरियाणा यासह देशाच्या इतर भागात झालेल्या जमात कार्यक्रमात सहभागी झालेल्या व तेथे जाऊन आलेल्या नागरिकांनी स्वेच्छेने येत्या 24 तासात माहिती द्यावी.आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी यासाठी त्यांनी 02442- 222604 या हेल्पलाईनवर स्वतःहून संपर्क साधावा यासाठी कोणतीही भीती न बाळगता स्वतःहून पुढे यावे आणि आपली आरोग्य तपासणी करावी असे आवाहन सोमवारी (दि.6) जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
यासाठी प्रशासनातर्फे त्यांना योग्य ते सर्व सहकार्य करण्यात येईल. कोरोना विषाणू प्रतिबंध हाच उपाय असल्याने आपले कुटुंबीय आपले मित्र परिवार समाज गाव हे या संसर्गापासून वाचवण्यासाठी सहकार्य करावे. जमात या कार्यक्रमात आपण सामील झाले होते ही माहिती आपण लपवून ठेवली व पुढे भविष्यात बाधित आढळून आल्यास जाणीवपूर्वक कोरोना विषाणूचा प्रसार व संसर्ग केल्याबद्दल आपणाविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 269, 270 व 188 नुसार कारवाई करण्यात येईल.या मेळाव्यात परदेशातील इंडोनेशिया मलेशिया व विविध देशातील यातील अनेकांना कोरोना विषाणूची बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले असून अनेकांचा मृत्यू झाला आहे. जमात या कार्यक्रमातून आल्यानंतर काही नागरिक जिल्ह्यात थांबले असण्याची शक्यता आहे. दरम्यान नागरिकांनीही आपल्या परिसरात गावात अशाकोणी व्यक्ती असतील तर त्यांनी संपर्क साधून प्रशासनास माहिती द्यावी असे आवाहनही जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले आहे.
Leave a comment