कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव व परिसरातील सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की, दिनांक 13 मे 2020 गुरुवार पासून कुंभार पिंपळगाव येथील सर्व बाजारपेठ औषधी दुकाने व रुग्णालय वगळता दिनांक 17 मे 2020 पर्यंत पूर्ण वेळ बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत कुंभार पिंपळगाव च्या वतीने घेण्यात आला असून सदरील बंदचे पालन कुंभार पिंपळगाव व परिसरातील सर्व नागरिक व्यापारी यांनी करावे अशी सूचना देण्यात येत आहे.
सदरील बंदचे पालन न करणारे व्यक्ती, नागरिक, व्यापारी इत्यादी यांना रुपये 5000 इतक्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे व सदरील दंडाची रक्कम ही रोखीने वसूल करण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी.अशी सूचना व विनंती जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्राम विकास अधिकारी,ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी महासंघ कुंभरपिंपळगाव व पोलीस उप निरीक्षक पोलीस चौकी कुंभार पिंपळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे.तसे प्रसिध्दी प्रत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.
Leave a comment