बीड
:प्रशासन पुन्हा पुन्हा घरात बसा म्हणून विनंती करत असताना ही रस्त्यावर खेळणे एका 14 वर्षयी मुलास महागात पडले.पेट्रोलिंग करिता आलेली पोलिसां ची गाडी दूर दिसताच घाबरलेल्या 14 वर्षीय शेख आयान शेख ईसा याचा जमिनीवर पडून मृत्यू झाला रविवारी दुपारी माजलगाव झेंडा चौक जूना तहसील रोडवर ही दुर्दैवी घटना घडली.
लाँकडाऊन असताना देखील विविध ठिकाणी लोक बाहेर फिरताना दिसतात.या बद्दल कालच लोकप्रश्न ने मुख्य रस्त्यावर कर्फ्यु गल्ली बोळात गर्दी बाबत वृत्त प्रकाशित केले होते.त्यानंतर ही लोक गल्ली बोळात घोळका करून बसलले होते.यात 12 ते 25 वयोगटातील वर्ग अधिक प्रमाणात रस्त्यावर दिसून येत आहे. रविवारी काही मुले संध्याकळी 6 वाजता बाहेर जुना तहसील माजलगाव च्या मोकळ्या जागेत खेळत होती तेंव्हा नेहमीप्रमाणे माजलगाव पोलीसांची गाडी पेट्रोलिंग साठी आलेली होती. ती त्या मुलांनी पाहिली आणि त्यांनी जोरात धावायला सुरूवात केली.पोलीसांना मुलं खेळता खेळता पळत असल्याची कल्पना देखील नव्हती. धावता धावता शेख आयन हा 8 वि वर्गात शिवाजी विद्यालयात शिकत असलेला चौदा वर्षीय मुलाचा पाय घसरून तो पडाला यातच त्याचे ह्रदय बंद पडले.त्याला ताबडतोब दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेले असता मात्र या लहानग्याचा प्राण गमावावा लागला.
प्रशासन राबवत असलेली संचार बंदी ही लोकांच्या हिताची असून ही लोक जागृती चा अभाव दिसून येत आहे.लोकांत गांभीर्य नसल्यामुळे असे
प्रसंग घडतात आणि त्याचे वाईट परिणाम घडतात सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करून घरी रहा सुरक्षित रहा बाहेर ओठ्यावर,गल्लीत,रस्त्यावर 4-2 शेजारी एकत्र येऊन गप्पा मारत बसु नका म्हणून परत परत सूचना देऊन ही लोक घराच्या बाहेर पडत आहेत.आशा घटना टाळण्यासाठी सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे
Comments (1)
Nice
Leave a comment