बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनाग्रस्त सापडलेला नाही. दरम्यान शहागड व चौसाळा चेकपोस्टवर आठ प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या पोलीस कर्मचार्यांसह शिक्षक व आरोग्य कर्मचार्यांच्या तपासणीचा निर्णय रविवारी आरोग्य यंत्रणेने घेतला. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठ पोलीस कर्मचारी बांधवांना हिम्मत अन् धैर्य दिले. चिंता करू नका,यास आपण एकत्र लढा देऊ असा निश्चयही त्यानीं व्यक्त केला आहे.
याबाबत एसपी हर्ष पोद्दार यांनी एक संदेश दिला आहे.‘जे पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड ज्यांच्या विलगीकरण करून रुग्णालयामध्ये तपासण्या करण्यात येत आहेत, त्यांच्यासाठी संपूर्ण बीड पोलीसदल प्रार्थना करत आहे की, आपल्या व आपल्या परिवारांच्या सर्व तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह यावेत’ असे पोद्दार यांनी म्हटले आहे.
दरम्यान या कठीण परिस्थितीत बीड पोलीस परिवाराचा प्रत्येक सदस्य आपल्या सोबत उभा आहे. कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका,यास आपण एकत्र लढा देऊ असा निश्चयही पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी व्यक्त केला आहे. आपल्या संदेशासोबत एसपी पोद्दार यांनी एक फोटो जोडला आहे. ज्यात जिल्हाबंदी असताना सीमेवरुन आत प्रवेश करणार्या लोकांना अडवणारे पोलीस बांधव आणि आतमध्ये प्रवेश करण्यासाठी काही लोक कसा आटापिटा करत आहेत हे दाखवले गेले आहे.
Leave a comment