जालना । वार्ताहर
जालना तालुक्यातील रामनगर येथील रहिवाशी असलेल्या एका 25 वर्षीय तरुणाचा अहवाल दि. 13 मे 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला असुन जिल्ह्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 15 एवढी झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली. जिल्ह्यात एकुण 1513 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 30 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 830 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 26 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 1256 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने -01 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 15 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1211, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 253, एकुण प्रलंबित नमुने - 26 तर एकुण 800 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.
14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या - 14, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 624 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या-76, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -344, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-11, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या -30, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या -00, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 307 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे. आजपर्यंत जालना जिल्ह्यात इतर राज्यातुन 103 व राज्याच्या इतर जिल्ह्यातुन 2 हजार 400 असे एकुण 2 हजार 503 नागरिक दाखल झाले असुन या सर्वांना 14 दिवस होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातुन आजपर्यंत बिहार-117, आंध्रप्रदेश-106, कर्नाटक- 05, गुजरात -18, तामिळनाडु - 20, हरियाणा - 01, उत्तराखंड-01, ओरिसा-105, मध्यप्रदेश-770, छत्तीसगड-23, उत्तरप्रदेश-2743,झारखंड-03, राजस्थान -161, तेलंगणा-44 असे एकुण - 4117 नागरिकांना परराज्यात पाठविण्यात आले आहे.
कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 344 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना -07, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह- 14, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-10,पोलीस प्रशिक्षण केंद्र-79, मॉडेल स्कुल, अंबा रोड, परतुर-01, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद-4, राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद - 59, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-06, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, भोकरदन-23, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन इमारत क्र. 1-64, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -23, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे - 12, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी-42 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 548 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 97 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 574 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 82 हजार 200 असा एकुण 309008 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Leave a comment