जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती  

जालना । वार्ताहर

राज्य राखीव बलगट क्र. 3 येथील एका जवानाच्या स्वॅबचा अहवाल प्रयोगशाळेकडुन काल दि.12 मे 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. जिल्ह्यात एकुण 1398 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 27 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 819 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 08 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 1230 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने -01 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 14 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1204, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 240, एकुण प्रलंबित नमुने - 08 तर एकुण 792 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या -15, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 610 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 08, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -268, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-09, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या -27, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या -31, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 274 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.   

जालना जिल्ह्यातुन इतर राज्यात जाण्यासाठी आजपर्यंत उत्तरप्रदेश-4250,बिहार-2779,मध्यप्रदेश-957, राजस्थान-658, पश्चिम बंगाल- 431, यासह उर्वरीत 14 राज्यातील एकुण -10455 तर जालना जिल्ह्यातुन महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाण्यासाठी 3712 अशा एकुण 14167 नागरीकांना पास उपलब्ध  करुन देण्यात आले आहेत. आजपर्यंत जालना जिल्ह्यात इतर राज्यातुन 94 व राज्याच्या इतर जिल्ह्यातुन 1952 असे एकुण-2046 नागरीक दाखल झाले आहेत. या सर्वाना 14 दिवस होम क्वांरटाईन करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातुन  आजपर्यंत  बिहार-117, आंध्रप्रदेश-106,कर्नाटक-05 ,गुजरात -18,   तामिळनाडु - 20,  हरियाणा -01, उत्तराखंड- 01, ओरिसा - 105मध्यप्रदेश- 770 , छत्तीसगड- 23, उत्तर प्रदेश- 3027, झारखंड -03,राजस्थान- 161, तेलंगणा- 44  असे एकुण 4401 नागरीकांना परराज्यात पाठविण्यात आले आहेत.

कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 268 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-14, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-10, पोलीस प्रशिक्षण केंद्र-79, मॉडेल स्कुल, अंबा रोड, परतुर-28, जिजाऊ इंग्लिश स्कुल जाफ्राबाद - 04, हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद-06, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, भोकरदन-23, डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन इमारत क्र. 1-64, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -23, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे 9  व इतर - 08 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 538 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 97 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 574 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 82 हजार 200 असा एकुण 3 लाख 9 हजार 008 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.