86 हजाराचा मुद्देमाल जप्त, हॉटेल मालकासह तीन जना विरुद्ध गुन्हा दाखल 

जालना । वार्ताहर

अंबड जालना महामार्गावरील न्यु.सुखसागर हॉटेलवर पोलीसांचानी धाड टाकून  27 बिअरचे बॉक्ससह मोपेड वाहनासह असा 86 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या बाबत थोडक्यात माहिती अशी की कोरोना वायरल मुळे पूर्ण जिल्ह्यात मद्य विक्री करण्यास जिल्हाधिकार्‍यांनी बंदी घातलेली असताना अंबड जालना रोडवरीळ न्यू सुखासागर हॉटेल आहे या हॉटेलचे मालक व कर्मचारी यांनी काल दि.11 मे रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास स्कुटी क्र एमएच 21, बी.डी.- 0804 हीच्या मदतीने आनंदसागर बिअरबार  रेस्टॉरंट येथुन 86 हजार सातशे रुपये किंमतीचे 27 बिअरची  बॉक्स अवैध रित्या वाहतूक करुन न्यु.सुखसागर हॉटेल  बारच्या पाठीमागे टिन पत्र्याचे शेड मध्ये साठवणुक केली जात होती. हाँटेल मालक किरण भरतराव खरात यांच्या अंबडमध्ये सुखसागर हॉटेल,न्यु.सुखसागर हॉटेल  बार व आनंदसागर बिअर बार अशा तिन हाँटेल आहेत,  अशी माहिती अंबड पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी पोलीस ङ्गौज ङ्गाट्या सह धाड टाकून 86 हजाराचा मुध्ये माल जप्त केला असून हॉटेल चे मालक किरण भरतराव खरात यांच्या सह तीन जना विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ही कार्यवाही पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सि.डी.शेवगण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्यासह स.पो.नि.संतोष घोडके,पो.उप.नि.सुग्रीव चाटे, शैलेश शेजुळ, जमादार वंदन पवार,संतोष कड, संदिप पाटील,लहाणे आदींनी कामगिरी बजावली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.