तोटा पंधराला तर गाय छाप तीस ते चाळीस रूपयाला.
तळणी । वार्ताहर
मंठा तालुक्यातील तळणी परिसरातील लॉकडाऊनच्या काळात गुटखा बंदी असतांना हा माल येतो तरी कसा हा प्रश्न पडला असुन. कंपनीचे नविन उत्पादन होत नसल्याने कारणामुळे साठवण करणारे व्यापारी तसेच दुकानदार तिपटीने विकत आहेत. तळणी व परीसरात गुटखा तंबाकु सिगारेट, बिडी च्या भावाने कळस गाठला आहे.
यामुळे नागरीक ञस्त असुन एकीकडे गरीबांच्या हाताला कामे नाही.तर पैसा आणायचा कुठुन हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. एकीकडे अडकलेल्यांना व अत्यावशक सेवेत काम करनार्या लोकांना सॅनिटायझर मास्क तसेच इतर बाबींची मदत करताना दिसतात माञ दुसरीकडे दुकानदार गोरगरीबांची लुट करतांना दिसत आहेत.
Leave a comment