तीर्थपुरी । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी येथील सर्व गावकरी व व्यापारी बांधवांना सुचित करण्यात येते कि, महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणू या संसर्गजन्य आजारामूळे आपत्कालीन परिस्थिती घोषीत करुन लॉकडाउन जाहीर केले आहे. परंतु अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गाव व परिसरातील नागरीक गावामध्ये गर्दी करीत आहेत, त्यामूळे आपल्या गावामध्ये लॉकडाऊनच्या नियमाचे पालन होत नसल्याचे दिसुन येत आहे.
या विषयी तीर्थपुरी येथील गावकर्यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकी मध्ये वैद्यकीय सेवा वगळुन, ईतर सर्व दूकाने/आस्थापना दि.12 मे 2020 वार मंगळवार ते दि.16 मे 2020 वार शनीवार पर्यंत संपुर्णपणे बंद ठेवण्यात यावा असा एकमुखी निर्णय घेण्यात आला. तरी, गावातील तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ, व व्यापारी बांधवांनी नोंद घ्यावी, व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायत कार्यालय तीर्थपूरी, महसुल विभाग तीर्थपुरी,पोलीस प्रशासन तीर्थपुरी,व्यापारी महासंघ तीर्थपुरी. सर्व पदाधिकारी व गावकरी तीर्थपूरी यांनी केले आहे
Leave a comment