जालना । वार्ताहर
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार राजेश राठोड यांचा उमेदवारी अर्ज आज प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, परिवहनमंत्री अनिल परब, प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष व उर्जामंत्री नितीन राऊत, गृहराज्यमंत्री सतेज (बंटी) पाटील, आ.अमरनाथ राजूकर, राजकिशोर उर्फ पापा मोदी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व माजी आमदार मोहन जोशी, प्रकाश सोनावणे आदी मान्यवर यावेळी उपस्थिती होते. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत असून आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता.
Leave a comment