भोकरदन । वार्ताहर
तालुक्यातील हसनाबाद येथे विजेच्या कडकडाट सह गारांचा पाऊस झाला.यावेळी अचानकपणे लतीपूर शिवारात विज पडून येतील नितेश काकाराव मैंद वय 25 वर्ष हा मेंढ्या सांभाळत असतांना यांच्या अंगावर आकस्मात विज कोसळून मॄत्यू झाला असून त्याच्या बरोबर बाजूला असलेला सोमिनाथ रायबा खडेकर वय 28वर्षे हा किरकोळ जखमी झाला आहे.दोघानांही हसनाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता नितेश यास वैद्यकीय अधिकारी डॉ अरूणराव मुळे व डॉ.अर्चना जेवरीकर यांनी तपासणी करून मॄत घोषित केले असून सोमिनाथ यास औषधोपचार करून सुट्टी देण्यात आली आहे.नितेश विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी व एक मुलगी आहे.पोलिस स्टेशन हसनाबाद चे बीट जमादार शेख जलाल व सुभाष चव्हाण यांनी आकस्मात मॄत्यूची नोंद घेऊन, पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र हसनाबाद येथील डॉ च्या ताब्यात दिले आहे.तरूणाचे आकस्मात मॄत्यू झाल्यामुळे त्यास शासनाची आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे.
Leave a comment