जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती
जालना । वार्ताहर
रंगनाथनगर इंदेवाडी परिसरातील 22 वर्षीय गर्भवती महिला तसेच कानडगांव ता. अंबड येथील 29 वर्षीय तरुण व 52 वर्षीय महिला यांच्या स्वॅबच्या नमुन्याचे अहवाल दि. 10 मे 2020 रोजी पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक जालना यांनी दिली. रंगनाथनगर इंदेवाडी पाण्याची टाकी, परिसर येथील 22 वर्षीय गर्भवती महिला सर्दी झाल्यामुळे शहरातील एका खाजगी दवाखान्यात झाली होती. तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती सदरील महिलेस न्युमोनिया झाल्याचे लक्षात आले नंतर त्यांनी संबंधित महिलेची जिल्हा सामान्य रुग्णालयास रवानगी केली. दि. 8 मे 2020 रोजी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी स्वॅबचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल दि. 10 मे 2020 रोजी प्रयोगशाळेकडून पॉझिटिव्ह प्राप्त आहे तसेच कानडगांव ता. अंबड येथील 29 वर्षीय तरुण मुंबई येथुन 52 वर्षीय आई व 58 वर्षीय वडील यांच्यासह गावाकडे आला होता. संबंधितांना गावातील नागरिकांनी तपासणीसाठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले होते. तेथील डॉक्टरांनी या तिघांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय, जालना या ठिकाणी पाठविले. या तिघांपैकी आई व मुलगा यांच्या स्वॅबच्या नमुना प्रयोगशाळेकडून दि. 10 मे 2020 रोजी पॉझिटिव्ह तर सदर तरुणाच्या वडीलांच्या स्वॅब निगेटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणुन तालुकास्तरीय पथकाने रंगनाथ नगर पाण्याची टाकी परिसर, जालना व कानडगाव ता. अंबड येथे घटनास्थळी भेट देऊन कन्टेटमेंट प्लानच्या अनुषंगाने सुचना दिल्या. सदरील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सहवाशीतांच्या पाठपुराव्यासाठी पथके तयार करण्यात आलेले असुन तेथील कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरु केले आहे. जालना जिल्ह्यातुन इतर राज्यात जाण्यासाठी आजपर्यंत उत्तरप्रदेश - 4003,बिहार-2575, मध्यप्रदेश-877, राजस्थान-658, पश्चिम बंगाल- 422, यासह उर्वरीत बारा राज्यातील एकुण -9793 तर जालना जिल्ह्यातुन महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाण्यासाठी 3027 अशा एकुण 12820 नागरीकांना पास उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. आजपर्यंत जालना जिल्ह्यात इतर राज्यातुन 83 व राज्याच्या इतर जिल्ह्यातुन 1284 असे एकुण - 1367 नागरीक दाखल झाले आहेत. या सर्वाना 14 दिवस होम क्वांरटाईन करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातुन आजपर्यंत बिहार - 20, आंध्रप्रदेश -46, ओरिसा- 83, मध्यप्रदेश -687, छत्तीसगड -08, उत्तर प्रदेश- 1327,झारखंड -03, राजस्थान- 59, तेलंगणा- 2 असे एकुण 2225 नागरीकांना परराज्यात पाठविण्यात आले आहेत.
जिल्ह्यात एकुण 1367 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 31 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 800 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 08 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 1144 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने -03 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -11 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1121, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 240, एकुण प्रलंबित नमुने-08 तर एकुण 769 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या-17, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 571 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या -67, सध्या अलगीकरण केलेल्या व्यक्ती -285, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित- 07, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या -31, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या -00, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 261 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.
कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 285 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना - 02, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-14, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-28, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -91, मॉडेल स्कुल अंबा रोड परतुर-27, जिजाऊ इंग्लिश स्कुल जाफ्राबाद- 15, हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद - 06, डॉ.बाबासाहेब हॉस्टेल भोकरदन-23 डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन इमारत क्रं 1-64, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल अंबड - 06, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल घनसावंगी -09 येथे अलगीकरण करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 516 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 83 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 571 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 81 हजार 300 असा एकुण 3 लाख 81 हजार 8 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Leave a comment