आष्टी । शरद रेडेकर
उण,वारा पाऊस याची तर तमा बाळगतच नव्हते आता तर कोरोना सारख्या महाभयंकर साथीतही आपल्या जीवाची परवा नकरता जनतेच्या सेवेत कार्य करत राहताना दिसत आहेत. ‘जान है तो जहाँ है’ हे लक्षात घेऊनच आज संपुर्ण देशात कोव्हीड-19 कोरोना साथीमुळे सर्व दुकाने कंपन्या लॉकडाऊन आहे.अशातच अत्यावश्यक सेवेत मोडली जाणारी आपली महावितरण सेनाही सर्वतोपरी तालुक्यात नव्हेतर खेडोपाडी देखील आपली सेवा देण्यास तत्पर आहे. आज आष्टी तालुक्यात कोठे विद्युत रोहित्राला बिघाड म्हणा, कोठे तार तुटली गेली.
शहरात बल्लीबोळात सारखे सारखे ब्रेक डाऊन होत आहे. फोन लावताच हजर होऊनच ती समस्या मार्गी लावण्याचे काम महावितरणचे कर्मचारी करताना दिसत आहेत. आपला जीव धोक्यात घालुन सदैव जनतेच्या सेवेत असणार्या महावितरच्या कर्मचार्यांना देखील महाराष्ट्र सरकारने अपघाती 50 लाखांचा विमा जाहीर करावा अशी मागणी माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी मुख्यमंञ्यांनकडे केली असल्याचे सांगीतले.
Leave a comment