कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव सह परिसरात शनिवाररोजी सायंकाळी 6 वाजता जोरदार वारे विजेच्या कडकडाटसह पाऊस झाला.परिसरातील कांदे काढणी सुरू असून टरबुजासह शेतक-यांच्या शेतीमालाचे नुकसान झाले , तुफान वादळी वा-यांने केळीची झाडे उन्मळून पडली .या वर्षी पावसाळा लवकरच सुरू होण्याचे संकेत निसर्गाने दिले असून हवामान खात्याने ही या वर्षी पावसाळा चांगला व लवकर सुरू होण्याचा अंदाज वर्तावला आहे .त्यानुसार या वर्षी अवकाळी पावसाळ्यास मे च्या दुस-या आठवड्यातच सुरू वात झाली.
Leave a comment