बदनापूर । वार्ताहर

कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा ङ्गटका सर्वाधिक परराज्यातील कामगारांना बसत असताना बदनापूर येथे अडकलेल्या 12 परराज्यातील मजुरांची रेल्वे स्थानक, औरंगाबादपर्यंत जाण्यासाठी चैतन्य स्कुलने बस उपलद्ध करून देऊन एक नवा पायंडा पाडला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. या दरम्यान बदनापूर येथे 12 मध्य प्रदेश येथील मजूत अडकलेले होते.

मागील दीड महिन्यापासून कसेबसे ते राहिले. नुकतीच शासनाने पर राज्यातील मजुरांना घरी जाण्यासाठी परवानगी दिली. या मजुरांनीही बदनापूर येथुन आपल्या गावी जाण्यासाठी रीतसर परवानगी घेतली. त्यानुसार औरंगाबाद रेल्वे स्थानकातुन जाणार्‍या रेल्वेमधून त्यांची जाण्याची तयारी प्रशाश्‍नाने केलेली होती. तथापी, लॉकडाऊनमुळे सर्व प्रवासी वाहतूक करणारे वाहने बंद असल्यामुळे त्यांना बदनापूर ते औरंगाबाद कसे जावे हा प्रश्‍न निर्माण झाला होता. ही माहिती येथील चैतन्य इंग्लिश स्कुलचे भरत जर्‍हाड यांना कळताच त्यांनी आपल्या शाळेची बस डिझेलसह देण्याची तयारी दर्शवली. रीतसर तहसीलदार संतोष बनकर यांनी या बसला परवानगी देऊन बसला तहसील कार्यालयात बोलावून घेतले. या ठिकाणी बस निर्जंतुक करून तसेच चालक कक्ष बंद करण्यात आला. त्या नंतर 12 मजुरांना या बसद्वारे औरंगाबाद येथील रेल्वे स्थनकवर सोडण्यात आले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.