आष्टी
जिल्ह्यासह संपूर्ण देशात लाॅकडाऊन स्थिती असून,यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखू शकतो.परंतु आष्टी शहरातील काहि मुस्लिमांनी शहरातील धार्मिकस्थळात नमाज पठण करण्यासाठी गर्दी केली.याची माहिती आष्टी पोलिसांना मिळताच पोलिसांनी नमाज अदा करण्यासाठी आलेल्या मुस्लिमांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आष्टी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊन सारखी परिस्थिती अमलात आणावी लागली.याचे जनतेने काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असतांंना आष्टी शहरातील मुस्लिम समाजाचे काहि जणांनी नमाज अदा करण्यासाठी धार्मिकस्थळात गर्दी केली होती.याची माहिती आष्टी पोलिसांना मिळताच पोलिसांनी येथील धार्मिक स्थळावर मोर्चा वळविला पोलिस आल्याचे समाजताच काहिहींनी तेथून पळ काढला तर याठिकाणाहून नमाज साठी एकञित जमाव जमविल्याप्रकरणी कलम 188,269,270 अन्वये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत आरोपी जिशान शेरुशेख,हबीब हुसेन सय्यद,जाकीर कय्युम सय्यम,शेख नाझीम रशीद,अजहर हबीब सय्यद यांच्या विरुद्ध पो.ना.प्रशांत क्षिरसागर यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Leave a comment