जालना । वार्ताहर

येत्या दोन दिवसात सर्व कोव्हीड केअर सेंटर सुसज्ज करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी रविंद्र परळीकर यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमा (आर. बी.एस.के). अंतर्गत  कार्यरत आयुष डॉक्टरांची कोव्हीड केअर सेंटरच्या तयारीच्या अनुषंगाने  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. विवेक खतगावकर, डॉ. संजय जगताप व डॉ. संतोष कडले यांच्यासह सर्व संबंधित डॉक्टर्स उपस्थित होते. या बैठकीमध्ये कोव्हीड केअर सेंटरबाबतची जबाबदारी सर्व वैद्यकीय अधिक्षक यांच्यावर देण्याचे निर्देशही  अपर जिल्हाधिकारी यांनी दिले. या बैठकीमध्ये उपस्थित  राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत डॉक्टर्संना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विवेक खतगावकर, डॉ. संजय जगताप व डॉ. संतोष कडले यांनी सखोल मार्गदर्शन केले. जालना जिल्ह्यातुन इतर राज्यात   जाण्यासाठी आजपर्यंत 7976 तर जालना जिल्ह्यातुन इतर जिल्ह्यात जाण्यासाठी 1803 अशा एकुण 9779 नागरीकांना पास उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तर आजपर्यंत जालना जिल्ह्यात इतर राज्यातुन 30  व राज्याच्या इतर जिल्ह्यातुन 108 असे एकुण 138 नागरीक दाखल झाले आहेत. 

जालना जिल्ह्यातुन आजपर्यंत  बिहार -3, आंध्र प्रदेश- 45, ओरिसा -93, मध्यप्रदेश-201 यात 58 जालना व परतुर 24 नागरीक औरंगाबाद येथुन मध्यप्रदेशला जाणा-या विशेष रेल्वे गाडीसाठी जालना येथुन  आज दि. 7 ते 2020 रोजी औरंगाबाद येथे पाठविले आहेत. असे एकुण 342 नागरीकांना परराज्यात पाठविण्यात आले आहे  जिल्ह्यात एकुण 1174 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 38 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 787 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 06 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 1116 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने -00 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 08 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1093, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 228, एकुण प्रलंबित नमुने-11 तर एकुण 749 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 19, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 468 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या -00, सध्या अलगीकरण  केलेल्या व्यक्ती -114, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित- 07, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या -38, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या -98, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 260 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे. कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 114 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना 02, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-26, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-28, पोलीस प्रशिक्षण केंद्र-22, परतुर-27, जाङ्ग्राबाद-6 तर भोकरदन येथे 03 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 484 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 80 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 540 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 68हजार 8 असा एकुण  2 लाख 86 हजार 208 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.