जालना । वार्ताहर

जिल्ह्याबाहेर व इतर राज्यात कामा निमित्य परतूर व मंठा मतदारसंघातील नागरिक  स्वतःचे गाव सोडून  स्थलांतरित झालेल्या ना आपल्या घरी परत आणण्या साठी मी स्वतः प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकात केले आहे  परतूर विधानसभा मतदारसंघ सह जिल्हाभरातील 1802 लोकांनी 3 मे 2020 पर्यंत अर्ज केलेले आहेत त्या अर्जावरील प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात झाली असून सदरील लोकांची यादी माननीय मुख्यमंत्री, माननीय पीठासीन अधिकारी विधानभवन मुंबई महाराष्ट्र आणि जिल्हाधिकारी जालना यांना पाठवलेली आहे. 

शासकीय आणि प्रशासकीय स्तरावर याबाबत कार्यवाही सुरू आहे लवकरच आपल्याला याबाबत सूचना केली जाईल 3 मे अंतर काही लोकांनी अर्ज केले आहे त्यांचे नाव या यादीमध्ये कदाचित नसेल त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही उद्या किंवा परवा दिवशी दुसरी यादी येईल त्यामध्ये त्यांची नावे असतील आपणा सर्वांना सुरक्षित आपल्या घरी परत येता यावे यासाठी शासन आणि प्रशासनाला आपण सर्वांनी सहकार्य करावे गावाकडे आल्यानंतर देखील आपण प्रशासनाला सहकार्य करावे आणि चौदा दिवस प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने सांगितल्याप्रमाणे आपण व्यवस्थित आणि सुरक्षितपणे घरी किंवा प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे राहावे. आपल्यामुळे इतरांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी निश्‍चितपणे घ्यावी.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.