51 हजाराची दारू सह रसायन जप्त
जालना । वार्ताहर
तालुक्यातील विरेगाव तांडा येथे दोन गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर दारूबंदी पोलीस पथकाने धाडी 51 हजाराचा मुद्देमाल आज दि 6 रोजी जप्त केला आहे.
या बाबत थोडक्यात माहिती अशी की जालना तालुक्यातील विरेंगाव तांडा येथे ते दोन्हीही अड्डे महिला चालवीत असल्याचे दर्शनास आले आहे त्यावरून मौजपुरी पोलीस ठाण्यात दोन महिलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, पोनि. राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदी पथकाचे पोउपनि. संपत पवार, कर्मचारी धनाजी कावळे, सुभाष पवार, सुरेश राठोड, राजेंद्र वेलदोडे, सुरेश नलावडे, पवन नरीयलवाले, परमेश्वर धुमाळ, किशोर जाधव, आकाश कुरील, पुजा सोनकांबळे, रोहिणी पांचाळ, चालक धोडीराम मोरे यांनी ही कामगिरी केली आहे.
Leave a comment