भारिप बहुजन महासंघाच्या वतीने आष्टी येथील एस.बी.आय.बँक मॅनेजरला निवेदन
आष्टी । वार्ताहर
परतुर तातुक्यातील आष्टी येथे स्टेट बँक आँफ इडिया शाखेला पंचनीस गाव जोडलेले आहेत,सध्या लाँकडाऊन मुळे ग्रामीण भागातील शेतकरी हा मोठ्या संकटात सापडलेला आहे,आर्थिक परिस्थिती नाजुक असल्यामुळे व्याजाने कोणी पैसे देत नाही म्हणुन सोने तारण कर्ज केलेले आहे व काही दिवसावर लागवडीचे दिवस आल्यामुळे बियाणे,खत खरेदी साठी शेतकर्याकडे पैसे नसल्यामुळे बळीराजा मात्र संकटात सापडला आहे तरी पिक कर्ज तात्काळ सुरु करा असा इशारा भारिप बहुजन महासंघ च्या वतीने आष्टी येथील एस बी आय बँक मॅनेजरला शेतकर्यांना पिक कर्ज तात्काळ वाटप सुरू करण्यात यावा या मागणीसाठी युवक जिल्हा अध्यक्ष अच्युत पाईकराव यांच्या वातीने निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित प्रवीण मोरे ,हदगाव सर्कल, अध्यक्ष ,सखाराम तांबे, विष्णू वाघमारे राजेंद्र भदरगे, इत्यादी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a comment