जालना । वार्ताहर
जालना जिल्ह्यातुन इतर राज्यात जाणा-या किंवा महाराष्ट्राचा इतर जिल्ह्यात जाणा-या नागरीकांसाठी जिल्ह्यात 32 ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आल्या असुन या ठिकाणी वैद्यकीय तपासणची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इतर राज्यातुन किंवा इतर जिल्ह्यातुन जालना जिल्ह्यात येणा-या नागरिकांनी स्वत: वैद्यकीय तपासणी करुन घेऊन 14 दिवस सक्तीने घरातच रहावे. तसेच आपल्या परिसरात किंवा गावात बाहेरच्या राज्य, जिल्ह्यातुन एखादी व्यक्ती आल्यास नागरीकांनी जिल्हा प्रशासनास माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
जालना जिल्ह्यातुन इतर राज्यात जाण्यासाठी आजपर्यंत 6822 नागरीकांचे तर जालना जिल्ह्यातुन महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाण्यासाठी 1328 अशा एकुण 8150 नागरिकांना पास उपलब्ध करुन देण्यात आले आहेत जिल्ह्यात एकुण 1167 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 35 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 780 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 23 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 1110 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने -00 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 08 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1075, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 228, एकुण प्रलंबित नमुने-23 तर एकुण 745 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे 14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 09, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 449 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या -01 , सध्या अलगीकरण केलेल्या व्यक्ती -212, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित- 10, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 35, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 01, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 260 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे. कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 212 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना 48, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह-41, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-26, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-28, पोलीस प्रशिक्षण केंद्र-25, परतुर-35, जाङ्ग्राबाद-6 तर भोकरदन येथे 03 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 482 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 80 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 540 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 68हजार 8 असा एकुण 2 लाख 86 हजार 208 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Leave a comment