शिरुर कासार
तालुक्यातील जाटनांदूर येथे ऊसतोडणी करून परतलेल्या आठ कुटुंबातील 20 सदस्यांना तर शहरातील आठ लोकांना प्रशासनाच्या वतीने होम कोरोंटाईन करण्यात आले.शिरूर शहरात मध्यरात्री इंदोर वरून आलेल्या एकाला माहिती मिळताच आरोग्य विभाग,पोलीस आणि नगरपंचायत मुख्याधिकारी निलम कांबळे यांनी ताब्यात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून शासकीय निवासी शाळा येथे तयार करण्यात आलेल्या विलगीकारण कक्षात ठेवण्यात आले.सदरील इसमाने घरीच मुक्काम केल्याने तासाभरातच त्याच्या पत्नीलाही दाखल करण्यात आले.या शिवाय मुंबई वरून तरनाशिक वरून शिरुर येथे आलेल्या पाच जणांना अश्या प्रकारे दोन दिवसात अठ्ठावीस विलीगिकरन कक्षात करण्यात आली.
चौकट
ग्रामीण व शहरी भागात गर्दीचे जथ्थे ?
कोरोना वायरस नाही या जागतिक महामारी जग थांबले असले तरी ग्रामीण भागातील व शहरी भागातील गल्लोगल्लीत गर्दीच्या जथ्थेच्या जथ्थे दिसून येत आहेत म्हणजे गांभीर्य किती आहे हे पाहत नाही एक शोकांतिका आहे.
चौकट
बाहेरगावावरून येणाऱ्या नागरिकांचा ओघ पाहता स्थानिकांनी सतर्क राहून त्याची माहिती महसूल,आरोग्य प्रशासनास तातडीने द्यावी.कोणीही माहिती लपवून ठेवून आपल्या जीवाला होणारा धोका पत्करू नये.
*श्रीराम बेंडे*
-तहसीलदार,शिरुर कासार
Leave a comment