जालना । वार्ताहर
जालना जिल्हा कपडा विक्रेता असोसिएशन व जालना रेडीमेड ण्ड होजिअरी मर्चंट असोसिएशनच्यावतीने आज दि. 4 रोजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांना त्यांच्या निवासस्थांनी भेट घेऊन लॉकडाऊनमध्ये कपडा व्यवसाय करण्यासाठी जालना येथील मार्केट सुरु करण्याबाबत निवेदन देऊन विनंती करण्यात आली. यावेळी प्रथम केंद्रीय मंत्री दानवे यांनी निवेदन घेऊन येणार्या कपडा व्यापारी शिष्टमंडळातील सर्व सदस्यांना मास्क् व सेनिटायझर देऊन स्वत:ची काळजी घेण्याबाबत सुचित केले तसेच त्यांच्या आगामी काळात कपडा व्यवसाय सुरु करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असेही आश्वस्त केले. यावेळी कांतिलाल राठी, गोवर्धन करवा, कमलेश कुकरेजा, .भारतीय जी,श्री.प्रभु नथनी, किशोर टेकवानी, अर्जुन गेही, सुमित धनाणी, राहुल बजाज, महेश नाथानी, योगेश संघानी आदी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a comment