बीड । वार्ताहर
रेशन कार्ड आहे परंतु ऑनलाईन कार्ड नसल्याने बीड तालुक्यातील वासनवाडी येथील 35 भिल्ल समाजातील कुटूंबाना रेशन दुकानदाराने धान्य देण्यास स्पष्ट नकार दिला. या कुटूंबाला जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानंतर भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडून 35 कुटुंबास पुरेल एवढे धान्य तहसील प्रशासनाच्या वाहनात मोफत धान्य दिले. मस्के यांनी प्रशासनाला सहकार्य तर केलेच परंतू गरीब कुटुंबाची वेळेला सेवा करुन पुण्य पदरात घेतले आहे.
भुकेच्या विवंचनेत अडकलेल्या या कुटुंबांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून धान्याची मागणी केली होती. परंतु कार्ड ऑनलाईन नसल्याने अधिकार असूनही या गरीब कुटुंबांना प्रशासनाला धान्य देता आले नाही. प्रशासनाला इच्छा असूनही शासनाचे धोरण आणि नियम आडवे आल्याने ते हतबल झाले होते. अखेर तहसीलदार किरण आंबेकर यांच्या माध्यमातून भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना संपर्क साधून अडचणीत सापडलेल्या भिल्ल समाजातील 35 कुटुंबांना धान्याची मदत करण्याचे सुचवले. प्रशासनाची सुचना लक्षात घेऊन राजेंद्र मस्के यांनी तात्काळ या 35 कुटुंबास पुरेल एवढे धान्य तहसील प्रशासनाच्या वाहनात पाठवून दिले.दरम्यान कोरोना आपत्कालीन परिस्थितीमध्ये पंकजाताई मुंडे यांच्या आदेशावरून भाजप जिल्हाध्यक्ष राजंेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यात भाजपचे कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेच्या सेवेमध्ये कार्यरत आहेत. गरजू लोकांना धान्य वाटपाचे काम केले जात आहे बीड शहरात गेली सहा दिवसांपासून दररोज भोजनाच्या पाकिटांचे पाकिटाचे वाटप बीड शहरातील विविध भागातील गोरगरीब जनतेला केले जाते जाते. कर्तव्यावर कार्यरत असणार्‍या पोलीस कर्मचारी यांना सुद्धा आवश्यकतेनुसार भोजन पुरवले जात आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.