माजलगाव । वार्ताहर
कोरोनाचे संकट घोगावण्यास सुरुवात झाली, तेव्हापासूनच शहरातील महेश ठोंबरे या पेशाने व्यापारी असणार्या अवलीयाने सामाजिक भान जपत आरोग्य कर्मचारी, पोलीस, महसुल यासह सार्वजनिक संपर्क येणार्यांना कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मोफत मास्कचे वाटप अभियान राबवले. आजपर्यंत त्यांनी 10 हजारावर मास्कचे मोफत वाटप करून कोरोनाला रोखण्याचे काम केले आहे.
कोरोनाच्या पार्शभुमिवर मास्कची बाजारात चढ्या भावाने विक्री होत होती. यापुढे तर ज्यादा पैसे देवूनही मास् मिळेना गेले होते. यावर शहरातील ठोंबरे सराफचे आनर महेश भगवानराव ठोंबरे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माजलगाव तालुक्यातील आरोग्य विभाग, महसुल विभाग, नगर परिषदेचे स्वच्छता करणारे कामगार, पोलीस विभागासह सर्व सामान्य नागरिक, भाजीपाला, फळ विक्रेते, पेट्रोल पंप, किराणा दुकानदार यांच्यासह नागरिकांना 10 हजारावर मास्कचे मोफत वाटप केले. ही मास्क महेश ठोंबरे यांनी शहरातील पिको-फाल शिलाई काम करणार्या गरजु सात महिलांना योग्य मोबदला देवून बनवून घेत आहेत. आज शहरात ज्यांच्या त्यांच्या चेहर्यावर ठोंबरे यांचेच मास्क दिसत आहेत.
------------------
Leave a comment