आष्टी । वार्ताहर
गेल्या महिनाभरापासून आष्टी तहसिलचे तहसिल वैभव महेंद्रकर हे रजे असल्याने त्याचा कारभार पाटोदा येथील तहसिलदार रमेश मुंंडलोड यांना देण्यात आला होता.परंतु कोरोना व्हायरचा प्रादुर्वभाव रोखण्यासाठी त्यांना पाटोदा आणि आष्टी तहसिलचा पदभार संभाळणे झिक्रीचे होत असल्याने शनिवारी (दि.4) जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आष्टी तहसिलच्या तहसिलदारपदी निलीमा थेऊरकर यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे.
आष्टी तहसिलदारपदी वैभव महेंद्रकर यांची नियुक्ती झाल्यापासून आष्टी तहसिलदार म्हणून असून अडचण नसून खोळंबा असे म्हणण्याची वेळ आष्टीकरांवर आली होती.गेल्या महिन्यात वैभव महेंद्रकर यांना एक महिन्याच्या रजेवर पाठविण्यात आले होते.त्यांच्या जागी पाटोद्याचे तहसिलदार रमेश मुंडलोड यांच्याकडे प्रभारी म्हणून पदभार देण्यात आला होता.दि.1 एप्रिल रोजी पुन्हा वैभव महेंद्रकर यांनी पदभार स्विकारला होता.परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सक्षम तहसिलदार म्हणून आष्टीला दुसरा तहसिलदार देण्याची मागणी राजकीय नेत्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.आज जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आष्टी तहसिलचा पदभार येथील नायब तहसिलदार निलीमा थेऊरकर यांच्याकडे प्रभारी तहसिलदार म्हणून पदभार देण्यात आला आहे.
Leave a comment