अनर्थ टाळण्यासाठी तात्काळ भुयारी मार्ग करावा-उपनगराध्यक्ष राजेश राऊत
जालना । वार्ताहर
जालनेकरांसाठी जीवनदायी ठरलेल्या घाणेवाडी-जालना पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनला मोठा धोका निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली असून समृद्धी महामार्गात सदर पाईप दबल्याने भविष्यात पाईप लाईन ङ्गुटून होणारे अनर्थ टाळण्यासाठी कंञाटदाराने समृद्धी महामार्गालगत पाईप लाईन साठी स्वतंत्र भुयारी मार्ग तातडीने तयार करावा. असे उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी सुचवले आहे. दि.2 रोजी घाणेवाडी - जालना पाणी पुरवठा योजनेची पाहणी करून उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी पालिका प्रशासनाकडून माहिती जाणून घेत सूचना केल्या. जालना शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी दिर्घकालीन विचार करून सन 1931 साली घाणेवाडी जलाशयाची उभारणी करण्यात आली.शहराचा विस्तारानूसार वाढत्या लोकसंख्येला घाणेवाडी जलाशयातूनच पाणी पुरवठा झाला.
शहागड व जायकवाडी-जालना पाणी पुरवठा योजना नंतर ही नवीन जालना भागास आजही घाणेवाडी जलाशयातूनच पाणी पुरवठा केला जातो.घाणेवाडी जल संरक्षण मंच,स्वंयसेवी संस्था व दानशूरांनी लोकसहभागातून गाळ उपसा केल्याने पाणी पातळीत वाढ होण्यासह परिसर सुशोभित झाला.असे राजेश राऊत यांनी नमूद केले. घाणेवाडी ते जालना दरम्यान मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाचे काम प्रगती पथावर असून कंञाटदाराने नगर पालिकेच्या लोकप्रतिनिधी व प्रशासनास विश्वासात न घेता परस्पर काम पूर्ण केले. त्यामुळे पाईप लाईन पुर्णपणे दबलेल्या स्थितीत असून भविष्यात पाईप लाईन ङ्गुटल्यास महामार्ग खोदावा लागेल. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग परिवहन व रस्ते विकास महामंडळ परवानगी देत नाही.अशी माहिती प्रशासनातील अधिकार्यांनी दिल्याचे सांगून राजेश राऊत म्हणाले, दबलेल्या रस्त्याखालील पाईप लाईन ङ्गुटल्यास विपरीत परिणाम होऊन पाणी पुरवठा पुर्णपणे ठप्प शकतो.भविष्यात उद्दभवनारे धोके ओळखून दुरूस्ती व अन्य कामे करता यावीत यासाठी स्वतंत्र पणे भुयारी बोगदा तयार करण्यात यावा. असे राजेश राऊत यांनी सांगितले. समृद्धी महामार्गाच्या डिझाइन मध्ये बदल होऊ शकत नसल्याचे सा.बां.विभागाच्या अधिकार्यांकडून सांगण्यात येते. तथापि या वर तोडगा काढण्यासाठी आपण सोमवारी ता. 04 जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याचे उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी सांगितले.
Leave a comment