नेकनूर । मनोज गव्हाणे
संचारबंदीला काहीशी शिथीलता मिळताच खरेदीच्या नावाखाली नेकनुरकर करित असलेली गर्दी धोक्याची आहे .पोलीस बांधव तुमच्यासाठीच दिवस-रात्र उभे राहून काळजी घेतात याचे भान बाळगा घसा कोरडा पडेपर्यंत स्वतः सहाय्यक निरीक्षक सचिन पुंडगे ओरडतात दोन दिवसापासून पोलिसांना काठी हातात घ्यावी लागली आहे. एका मर्यादेनंतर कायदा बोलू लागला तर बाहेर पडणे मुश्किल बनेल त्यामुळे वेळीच स्वतःला आवरा.
संचारबंदीचे पालन करण्यासाठी 90 टक्क्के नागरिक पोलिसांना सहकार्य करीत घराबाहेर पडण्याचे टाळत असताना दहा टक्के नागरिकांमुळे पोलिसांना तान होत आहे. कर्मचार्यांची कमतरता दिवस रात्र गस्त करण्याबरोबरच चौकात उभे राहून वाहनांची तपासणी शिवाय हद्दीतील गावात लक्ष ठेवणे अशा नाजूक स्थितीत प्रत्येकाकडून पोलिसांना सहकार्य अपेक्षित आहे. यासाठी सहाय्यक निरीक्षक सचिन पुंडगे स्पिकरद्वारे आवाहन करीत आहेत. सकाळी संचारबंदीच्या शिथलतेत खरेदी करण्यासाठी अलीकडे होऊ लागलेली झुंबड डोकेदुखी ठरू पाहत आहे. यामुळे पोलिसांनी हातात काठी घेत यावर नियंत्रण मिळवणे सुरु केले आहे.पोलीस तुमचीच काळजी घेत आहेत वेळीच सुधरा, गर्दी टाळा, सहकार्य करा नसता एका मर्यादेनंतर पोलिसी खाक्या याला आटकाव घालेल किमान स्वतःसाठी तरी बाहेर पडणे टाळा.
Leave a comment