तिर्थपुरी । वार्ताहर
महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश भैय्या टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.चे उपाध्यक्ष महेंद्रभाऊ पवार यांच्या वतीने तिर्थपुरी येथे पवित्र रमजान महिन्या निमित्त मूस्लीम समाजबांधवांना घरपोच ईफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली. येथील मूस्लीम समाज बांधवांना पवित्र रमजान महिन्यानिमित्त लॉकडाऊन असल्याने महेंद्रभाऊ पवार यांच्या वतिने घरपोच ईफ्तार देण्यात आली.
यावेळी श्रीकृष्णभाऊ बोबडे, प्रा.अशोक शिंदे, शेख अनिस, शेख मन्सुर, मैनोद्दीन तांबोळी, ईसाक कूरेशी, रमेश बोबडे, शेख अकिल, शेख अजहर, शेख रहीम, शेख जब्बार, दत्ता चव्हाण, ज्ञानेश्वर मोरे,शेख उस्मान, शेख रशीद, शेख रफीक, शेख वाहेद, आदी उपस्थित होते.
Leave a comment