मंठा । वार्ताहर
कोरोना संसर्गजन्य विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडुन लॉकडाऊन व संचारबंदी करण्यात आली आहे. यादरम्यान सौरभ झोल मित्र मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात सौरभ सतिशराव झोल यांचा अभिष्टचिंतन निमित्ताने शहरातील निराधार व गरजूंना धान्य वितरण करण्यात आले.
सामाजिक बांधिलकीतून आपण वेळोवेळी निराधार व गरजूंना मदत करणार असल्याचे सौरभ झोल यांनी आपला माणस असल्याचे बोलुन दाखवले. याप्रसंगी सोशल डिसटन्सचे व प्रशासनाच्या सुचनांचे पालन करत सौरभ झोल, सुनील मोरे, कुणाल कमळकर, अभिजीत वायाळ, करण बोराडे, सौरभ दायमा , अमोल थिटे, आकाश राठोड, सुजय कदम, मयुर जगदाळे, वैभव गोरे, शुभम देशमुख, अविनाश जाधव, धनंजय दांगट, मुकेश गायकवाड, सक्ेहल हिवाळे यांच्यासह आदींनी परिश्रम घेत लॉकडाऊनच्या काळात गरजू व निराधारांना मदतीचा हात देत आहेत.
Leave a comment