ऊसतोड कामगारांसाठी शंभर गुन्हे अंगावर घेईल
आ. सुरेश धस आक्रमक झाले
आष्टी । वार्ताहर
ऊसतोड कामगारांच्या मदतीसाठी जिल्हाबंदीचा आदेश मोडुन स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थेचे आ. सुरेश धस यांच्यावर आष्टी पोलीसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर सुरेश धस अधिकच आक्रमक झाले आहेत. गुन्हा दाखल केला आता अटक करा, मी जामिन मागणार नाही, उसतोड कामगारांसाठी आपण शंभर गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहोत, राज्य सरकारने ऊसतोड कामगारांना नगरच्या सरहद्दीपर्यंत सोडणार्या पुणे आणि नगरच्या प्रशासनावरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
यावेळी बोलताना आ.धस यांनी ऊसतोड मजूरांच्या बाबतीत सरकार इसेन्सियल कम्युडिटी अक्ट नुसार साखर कारखाने सुरु ठेवत आहेत.माञ सद्यस्थितीत कोरोनामुळे संपूर्ण देश लाकडाऊन आहे.अशा स्थितीत जर हे मजूर काम करीत आहेत तर त्यांच्या जिविताशीच खेळण्याचा हा प्रकार आहे.शेवटी ते देखील मानसच आहेत.आजच्या दिवशी देखील अनेक कारखाने सुरु आहेत,मग त्या मजूरांमध्ये सोशल डिस्टंट आहे का? एका एका कारखान्यावर आज हजारो कामगार आहेत ही गोष्ट कोणी लक्षात घेत नाही.केवळ 50 रुपये वाढवून देऊ आणि किराणा देऊन मजूरांची बोळवण करु हा कोणता नियम आहे.स्व.मुंडे आणि शरद पवार यांच्या लवादामध्ये ऊसतोड मजूरांना घरी सोडण्यापर्यंतची जबाबदारी ही कारखान्यांची होती.अशावेळी हा नियम लागू होत नाही का? तीन तीन जिल्हे ओलांडून हे कामगार परतले मग तिथले प्रशासन काय करत होते,त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे असले हजारो गुन्हे दाखल झाले तरी मी ते अंगावर घ्यायला तयार आहे आणि अटक केले तर मी जामीन सुद्धा करणार नाही म्हणत आ.धस यांनी राज्य सरकारवर टिकेची झोड उठवली.
-----------------
05
Apr
Leave a comment