कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या ग्रामीण कुंभार पिंपळगाव येथे हमीभावाने तूर खरेदी करण्याची मागणी आता शेतकर्यांमधून होत आहे नाफेडच्या वतीने तूर खरेदी ची मुदत वाढ देण्यात यावी नाफेड अंतर्गत तुर खरेदीची मुदत मार्च मध्ये संपन्न्यात आली परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये लॉक डाऊन सुरू झाल्याने 22 पासून संपूर्ण महाराष्ट्र बंद असल्याने तुर घरात पडून सदरील मुदतीत अनेक शेतकरी योजनेपासून वंचित राहिलेले आहे. त्यामुळे या खरेदी करिता मुदत वाढविण्यात यावी व शेतकर्यांना या योजनेचा फायदा मिळावा. शेतकरी यावर्षी भयानक आर्थिक अडचणीत असून शेतकर्यांच्या शेतीमालाचे भाव कोरोनाच्या संकटा मुळे संपुर्णताहा पडले आहे .हमीभावाने तूर खरेदी करण्यात यावी त्याकरिता तूर हमीभाव खरेदी केंद्र करण्यात अशी मागणी आता शेतकर्यांमधून जोर धरत आहे.
Leave a comment