बीड | वार्ताहर
शिवसेनेच्या शिंदे गटाचे बीड जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्याविरुद्ध पेठ बीड आणि परळी पोलीस ठाण्यात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता कुंडलिक खांडे विरुद्ध कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात झाली आहे. ज्ञानेश्वर खांडे यांनी दाखल केलेल्या यापूर्वीच्या गुन्ह्यात कुंडलिक खांडे यांना आज शनिवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर खांडेला बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
कुंडलिक खांडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत विधाने होती. यानंतर कुंडलिक खांडे यांच्या कार्यालयाची तोडफोड झाली होती. दरम्यान आज कुंडलिक खांडे यांना एका मारहाणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
बीड-अहमदनगर मार्गावरील जामखेड येथून कुंडलिक खांडे यांना आज शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. नंतर त्यांना बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. काही दिवसापूर्वी कुंडलिक खांडे यांच्याविरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यामध्ये कुंडलिक खांडे यांना पोलिसांनी अटक केली आहे.याप्रकरणी आरोपीला दुपारी बीड न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी दिली.
Leave a comment