बीड । सुशील देशमुख
बीड शहरासह परिसरात आज रविवारी (दि.२३) सकाळपासून पावसाची संततधार कायम राहिली आहे. या पावसामुळे लागवड केलेल्या कापसासह खरीपातील पिकांना वाढीसाठी दिलासा मिळाला आहे. शहरातील सखल भागात पाणी साचल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांसह वाहन चालकांचे हाल झाले. बीड नगरपालिकेने नाल्यांची सफाई न केल्याने पावसाच्या पाण्यामुळे नाल्यातील कचरा रस्त्यावर पसरल्याचे आजच्या पावसानंतर दिसून आले.(online portal news by sushil deshmukh)
गतवर्षी दुष्काळाला सामोरे गेलेल्या बीड जिल्ह्यात यंदा वरुणराजाची कृपादृष्टी झाली आहे. १ जूनपासून बीड तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्या जोरावर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या ओळखल्या आहेत रविवारी (दि.२३) सकाळपासून दुपारी दीड वाजेपर्यंत पावसाची संततधार कायम होती. अधूनमधून थांबणारा पाऊस दुपारी अडीच नंतरही पुन्हा सुरू झाला. या पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्याचे दिसून आले. नगरपालिकेने शहरातील अनेक ठिकाणच्या नाल्यांची सफाई केलेली नाही, त्यामुळे नाल्यातील कचरा पावसाच्या पाण्यासोबत रस्त्यावर वाहताना दिसला.
प्रकल्पीय पाणीसाठा जैसे थे
बीड जिल्ह्यात १ जूनपासून पडत असलेल्या पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी 50% क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या केले असल्या तरी दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र अजूनही कायम आहे. बीड जिल्ह्यात गोदावरी व कृष्णा खोऱ्यातंर्गत १ मोठा, १६ मध्यम आणि १२६ लघु प्रकल्प आहेत. सध्या पडत असलेल्या पावसामुळे पेरणी झालेल्या पिकांना दिलासा मिळाला असला तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र अजूनही सुटलेला नाही. गेल्या २० दिवसात काही महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे मात्र प्रकल्पातील पाणीसाठा वाढण्यासाठी अजूनही मोठ्या पावसाचे आवश्यकता आहे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणकडून दर आठवड्याला प्रकल्पीय पाणीसाठ्याची नोंद घेतली जाते.
तालुकानिहाय पाऊस (आकडे मिलिमीटरमध्ये)
बीड जिल्ह्यात २१ जून अखेरपर्यंत झालेला तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे:- बीड १.१, पाटोदा ५.१, आष्टी१.४, गेवराई २.८, माजलगाव ३.४, अंबाजोगाई ०.३, केज १.२,परळी ०.१, धारूर ०.९, वडवणी ०.० शिरूरकासार ७.८ (एकूण बीड जिल्हा:- २.०मिलिमीटर)
२२ दिवसात २९ टक्के पर्जन्यमान
बीड जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी ५६६.१ मिलिमीटर इतकी आहे. यापूर्वी जिल्ह्याची वार्षिक सरासरी 666.66 मिलिमीटर इतकी होती.यंदा १ जून ते २३ जूनपर्यंत जिल्ह्यात १५९.५ टक्के पर्जन्यमान झाले आहे, ते २९ टक्के इतके आहे.
Leave a comment